पंढरपूर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
पंढरपूर /प्रतिनिधी
महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या वतीने संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा यांच्या पंढरपूर येथील लक्ष्मी टाकळी येथे निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
या बैठकीस शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, सोलापूर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ अनिताताई माळगे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, महिला जिल्हाप्रमुख सौ मुबिना मुलानी, सौ आरती बसवंती,दिलीपभाऊ कोल्हें ,युवासेना जिल्हाप्रमुख प्रियंका परांडे , उमेश गायकवाड, दादासाहेब पवार, संतोष जाधव सर, शिवाजी बाबर, सौ मुक्ताताई खंदारे, सौ यास्मिन पठाण, सौ स्वामी मॅडम, महेश ताठे ,महादेव भोसले ,सरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, रेश्मा साठे, रोहिणी साठे, पवार मॅडम, जाधव मॅडम, प्रीतम जाधव, विक्रम आसबे, विकी मेटकरी, शुभम लकेरी संजय सरवले भाऊ कदम व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये 2014 पासून ते 2024 पर्यंत सातत्याने पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातून बीजेपी चे उमेदवार यांना आज पर्यंत लीड दिलेला आहे. त्या लीडमध्ये अधिकची भर नक्कीच आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी घालण्यात कमी पडणार नाहीत व बीजेपीच्या उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतः उमेदवार समजून जीवाचे रान करून काम करून अधिकचा लीड देऊ असे आश्वासन सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महेशनाना साठे यांनी उमेदवार राम सातपुते यांना दिले.
यावेळी राम सातपुते यांनी बोलताना सांगितले की मित्र पक्षांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल त्याचबरोबर निधीच्या किंवा विकास कामाच्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे अभिवचन दिले. या कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.