मोहोळ विधानसभा मतदारसंघात घड्याळाला तुतारी पडणार भारी
पंढरपूर/प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून राजू खरे यांना संधी देण्यात आली आहे.यामुळे या मतदारसंघात राजू खरे यांचे आमदार यशवंत माने यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. राजू खरे यांनी या मतदारसंघात कोणतेही पद नसताना शासकीय निधी खेचून आणून मोठे काम केले आहे. त्यांनी मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता देण्याचे काम केले आहे तसेच पाणीटंचाईच्या वेळी मोहोळ मतदार संघात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम केले आहे.
या कामाची दखल घेऊन मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्हावर महाविकास आघाडीच्या वतीने खरे यांना उतरवण्यात आले आहे.
नुकतीच त्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन आमदारकीची संधी मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर तसे लिहून दिले आहे.
यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार यशवंत माने विरोधात महाविकास आघाडीचे राजू खरे यांचे तगडे आव्हान असणार आहे.