पंढरीत बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ता संवाद अभियान
पंढरपूर /प्रतिनिधी
सध्या राज्यात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचा जो काही आटापिटा चालू आहे. यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे. बहुजन समाजाच्या प्रश्नांवर पोकळे चर्चा करून उपोषण, राजकारण करून सत्ता मिळवायची शासनाने अनेक गोष्टी जनतेवर जबरदस्तीने लादल्या पण जातीचं काय? आरक्षणाचं काय? आताची सिस्टीम बघता बारा बलुतेदार आणि अनुसूचित जाती जमाती सुद्धा इतिहास जमा होणार असे चित्र आहे. यासाठी बहुजन समाजाने संघटित होऊन लढले पाहिजे. महाराष्ट्रात एकूण ५ लोकसभा मतदार संघाने २८ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. तरीही विकासाच्या बाबतीत ओरडच आहे. मग लोकप्रतिनिधी करतात काय? फक्त सत्ता मिळवण्यासाठी विकासाचे गाजर दाखवून मतदाराचा बळी देणे हे कोणत्याही समाजासाठी घातक आहे. असे परखड बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष एडवोकेट कोमलताई साळुंखे ढोबळे यांनी व्यक्त केली.
बहुजन रयत परिषद पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. बुधवारी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे बैठक पंढरपूर येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
त्यापुढे बोलताना म्हणाल्या की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर कोटी निधी जाहीर केला होता. मात्र कोरोनामुळे जयंती उत्सव झाला नाही. मग तो निधी गेला कुठे? रमाई आवास योजनेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी घरकुल योजना राबविण्यात आली परंतु याचा फायदा कुठेही मातंग समाजाला झाला नाही. सरकारने बार्टीच्या धरतीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली. यासाठी प्रत्येक वर्षी 105 कोटी रुपये निधीची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात याचा फायदा समाजास होत नाही. अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड वर्गवारी करण्यासाठी मातंग समाज ३० वर्षापासून सातत्याने पाठव पुरावा करत आहे. अनेक राज्यांनी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केले आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारने अ, ब, क, ड, वर्गवारी करण्यासंदर्भात आजपर्यंत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला नाही. तो कधी करणार?
अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या विविध प्रश्नाबाबत राज्यव्यापी आंदोलन केले जाईल असा इशारा कोमल साळुंखे ढोबळे यांनी दिला.
पंढरपूर येथील सांगोला चौक मोरे महाराज मठ येथे या कार्यकर्ता संवाद अभियान कार्यक्रमास बहुजन रयत परिषद संस्थापक प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, बहुजन रयत परिषद प्रदेशाध्यक्ष एडवोकेट कोमलताई साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राज्य सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, राज्य उपाध्यक्ष ना.मा साठे, राज्य संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, उपविभाग प्रमुख आबासाहेब वाघमारे, विभाग प्रमुख नागेश यादव, प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिव बंडू पवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास पारधे, जिल्हा कार्याध्यक्ष चंदू चव्हाण, सोलापूर शहराध्यक्ष अमित तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख समाधान वाघमारे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष संभाजी भोसले, पंढरपूर शहराध्यक्ष किशोर खिलारे, वस्तीग्रह कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष अमोल हुंगे, सोलापूर शहर संपर्कप्रमुख बेसकर खालिद यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्यावतीने नागेश यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.