पंढरपूर येथे रविवारी सकल धनगर समाजाची विविध मागण्यासाठी बैठक
पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे खालील मागण्या करण्यात आल्या. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील व सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे व एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी. पंढरपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी देण्यात यावा. अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी. अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा. आदी मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचे ठरविण्यात आले. धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष असल्याचे लोकसभेला निवडणुकीत धनगर समाजाने महायुती सरकारला दाखवून दिले आहे.धनगर समाजाचा पूर्ण विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील असा सूर या बैठकीतून दिसून आला.या बैठकीचे नेतृत्व सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी माऊली हळणवर, अमोल कारंडे, सुभाष मस्के सर, आदित्य फत्तेपूरकर, सोमनाथ ढोणे, संतोष बंडगर, प्रशांत घोडके, मक्कन्ना बाराचारी, महेश खसगे, आप्पा पुजारी, बंडू पुजारी, प्रवीण सलगर, महेश गुंडे, दादा खटके, दादा कोळेकर, संजय माने, अमोघ सिद्ध पाटील, संजय लवटे, बाजीराव खडके, विजय चोरमले, सिताराम मेटकरी, सूर्यकांत येजगर, ज्ञानेश्वर गुंडगे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.