सदर आदेश व खरेदी व्यवहार रद्द न झाल्यास आंदोलन करण्याच आरपीआयने दिला इशारा
प्रतिनिधी /पंढरपूर
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील गट नंबर १४/१अ/२/अ हि जागा ८ एकर जागा विस वर्षांपूर्वीच नगरपालिका प्राधिकरणाने पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी स्टेडियम उभे करण्यासाठी आरक्षित केली आहे. सदर जागेवर जुनी शर्त असून सुद्धा पंढरपूर येथील भूमाफियाने ही जागा बोर्ड लावून प्लॉटिंगसाठी डेव्हलप केली असल्याचा आरोप आरपीआयचे नेते दीपक चंदनशिवे यांनी केला आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी दीपक चंदनशिवे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय गाठत पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार व सहनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबतची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा खेळाडू व नागरिकांना सोबत घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याप्रसंगी दीपक चंदनशिवे, केदार चंदनशिवे, शंकर चंदनशिवे, ज्ञानेश्वर चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, सुहास चंदनशिवे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर शहरात स्टेडियम व्हावे व पंढरपूर तालुक्यातून अनेक खेळाडू निर्माण व्हावेत. यासाठी येथील जनतेची अनेक वर्षापासून स्टेडियम व्हावे ही मागणी होती. मात्र पंढरपूर शहर व तालुक्यातील काही निवडक भूमाफिया या जागेवरती प्लॉट विक्री बोर्ड लावून विक्री करीत शासकीय आरक्षित जागा हडप करण्याचा काळा धंदा होत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वी अनेक भूखंड असेच हडप केल्याचे अनेक तक्रारी येऊन सुद्धा या भूमापयांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही हे भूखंड माफिया मुजोर झाले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा आदेश व हे खरेदी व्यवहार रद्द नाही झाल्यास पंढरपूर तहसील समोर खेळाडू व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल त्याचबरोबर पंढरपूर शहरात ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी समाज कल्याण विभाग अंतर्गत वस्तीग्रह असून ते जागा अभावी भाड्याच्या बिल्डिंगमध्ये गेले वीस वर्षे भरत आहे.
मागासवर्गीय ग्रामीण मुला मुलींच्या वस्तीग्रह बांधण्यासाठी जागेची मागणी अनेक वर्षांपासून करुणही नगरपालिका जागा उपलब्ध करून देत नाही.
स्टेडियमसाठी शासकीय आरक्षित जागा असे भूखंड माफिया हडप करून प्रचंड माया जमवत आहेत. अशी खंत यावेळी दीपक चंदनशिवे यांनी व्यक्त केली.