पंढरपूर लोकनायक/ प्रतिनिधी
उन्हाळ्याची सुरुवात होण्याआधीच उजनी धरणातील पाणी कमी झाल्याचे समजते. नेते मंडळींच्या तसेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उजनी धरणातील पाणी वारे माप सोडल्यामुळे आज तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे भरणाऱ्या मागीवारीच्या निमित्ताने वारकरी बांधवांना चंद्रभागेच्या पवित्र पात्रामध्ये स्नान करण्याचे भाग्य लागणार की नाही.? अशी परिस्थिती आज चंद्रभागेच्या नदीपात्रामधील पाणी डबके स्वरूपात सर्वत्र नदीपात्रात दिसून येत आहे.
वारकरी भाविकांशी संवाद साधले असताना वारकरी बांधवांनी चंद्रभागेतील पाणी डबक्याच्या स्वरूपात साचलेले आहे. आणि साचलेल्या या डबक्याच्या पाण्यामधून भाविक भक्त स्नान करीत आहेत. याच पाण्यामध्ये शहरातील जनावरे देखील धुतली जात आहे. गाड्या धुतल्या जात आहेत. वारकरी बांधवांनी चंद्रभागेचे स्नान कसे करावे? अशी तक्रार वारकरी भाविक भक्त करीत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
पाटबंधारे व नगरपालिका यांच्या माध्यमातून मागीवारीच्या निमित्ताने चंद्रभागेमध्ये वारकरी बांधवांना स्नान करण्यासाठी पाणी सोडण्यात यावे. अशी कळकळीची विनंती भाविक भक्त करीत असताना दिसून येत आहेत.