मतदारसंघाच्या विकासासाठी राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे केले तृप्तीताई खरे यांनी आवाहन
कोणतेही पद नसताना मोहोळ मतदार संघात कोट्यावधीचा विकास निधी राजू खरे यांनी खेचून आणला असून सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते म्हणून राजू खरे यांची ओळख मोहोळ मतदार संघात निर्माण झाली आहे.अल्पावधीतच मोहोळ मतदारसंघात राजू खरे नावाचं एक वादळ निर्माण होताना दिसून येत आहे. त्यांना साथ देण्यासाठी त्यांचा पत्नी सौ.तृप्तीताई खरे यांनी देखील मतदारसंघात झंझावात दौरे सुरू केले आहेत. अस म्हंटल जात की एखाद्या कर्तृत्ववान पुरुषांच्या पाठीमागे महिलेचा हात असतो अगदी त्याच प्रमाणे उद्योजक राजू खरे यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी खंबीरपणे साथ देताना दिसून येत आहेत. काही दिवसांपासून त्यांनी महिलांसाठी विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवून महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.
याचाच प्रत्यय म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमन या गावात महिलांचा हळदी कुंकू समारंभ व गावातील भजनी मंडळास खरे यांच्या कुटुंबाकडून सर्व साहित्य स्वखर्चाने देण्यात आले.
यावेळी सौ.तृप्तीताई खरे यांनी आपले विचार मांडत गावातील महिलांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात विकास कामे करण्यासाठी राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती.
यावेळी सौ.तृप्तीताई खरे यांचे गावात जल्लोषात स्वागत करत गावातील मध्यवर्ती भागातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.त्यानंतर कार्यक्रम स्थळी जाऊन प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सौ तृप्तीताई खरे यांचे महिला गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थित असलेल्या काही मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे पोवाडे, भाषणांनी उपस्थित महिलांचे मने जिंकली,तसेच भजनी मंडळाच्या भजनाने संपुर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.