सर्व मातंग समाजातील संघटनांच्या वतीने भाजपा महायुतीच्या नेतेमंडळींना साकडे
पंढरपूर /प्रतिनिधी
आमदार अमित गोरखे यांची मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी सर्व मातंग समाजातील संघटनांच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाला दुग्धाभिषेक
श्री क्षेत्र पंढरपूर येथील नामदेव पायरी येथे घालण्यात आला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे म्हणाले की आमदार अमित गोरखे यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना व महायुतीला वाढीव मतदान मिळणेसाठी परिश्रम घेतले आहे.
जनतेची सेवा करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांना महायुती सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदी वर्णी लागावी अशी मागणी प्रसारमाध्यमातून महायुतीच्या नेतेमंडळींकडे मातंग समाजाच्या वतीने माजी नगरसेवक कृष्ण वाघमारे यांनी केली.
यावेळी नगरसेवक कृष्णा वाघमारे, चेअरमन धंनजय वाघमारे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवक संघटना तालुका अध्यक्ष संजय अडगळे, महाराष्ट्र मातंग परिषदचे राजु सकट , लहूजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस देविदास कसबे, अनिल कांबळे,
सुधिर रणदिवे, बापू वाघमारे, गणेश चव्हाण, शुभम चव्हाण, आकाश शिंदे, अजित खिलारे, संदेश कांबळे, कृष्णा कांबळे यांच्यासह विविध संघटनेचे प्रमूख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.