पाणी प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा येथील महिलांचा विचार
पंढरपूर/प्रतिनिधी
राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने उजनी धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावल्याने पंढरपूर नगरपालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात पंढरपुर येथील दाळे गल्ली परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच वारंवार पाण्याचा टँकर बोलून सुद्धा पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी मिळत नाही
याबाबत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपुरातही लक्ष घालून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पुढे येत आहे.
यावर येथील लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारे माजी आमदार प्रशांत परिचारक,युवक नेते भगीरथ भालके,विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील हे काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी मागील काही दिवसांपूर्वी याच पाणी प्रश्नावर संबंधित आजी माजी नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची खडा जंगी झाली होती तरीसुद्धा पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे पुन्हा एकदा पाणी प्रश्न उद्भवला असून महिलांमधून संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्न सुटला नाही तर आगामी काळात लोकसभा निवडणुकीवर ही बहिष्कार टाकू असा इशारा महिलेने दिला आहे त्यामुळे आता तरी पालिका प्रशासनाला जागी येणार की नाही असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे